माथेरान पर्यटनस्थळी येणार्‍या पर्यटकांसाठी मेजवानी

मे महिन्यात संगीत मैफिल,अश्‍व शर्यतींचा थरार

। माथेरान । वार्ताहर ।

मुंबई – पुणे भागात तापमानाचा पारा वाढल्याने अंगाची लाही – लाही होत असताना माथेरानमधील वातावरणात मात्र कमालीचा गारवा जाणवत आहे. या गारेगार वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना अश्‍व शर्यतींना थरार व सुरेल संगीत मैफिलीची मेजवानी मिळणार आहे.

महाराष्ट्रातील प्रदूषणमुक्त थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या माथेरान मध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. हे युनिक पर्यटनस्थळ येथील थंड वातावरण गर्द वनराई, घोडेस्वारी आणि नॅरोगेजवर डोंगरदरीतून धावणार्‍या मिनिट्रेन करिता प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य थंड वातावरणात दोन चार दिवसांच्या मुक्कामी पर्यटक येऊ लागले आहेत. येथे येणार्‍या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी शहराच्या मुख्य मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माधव गार्डनमध्ये गाण्यांची संगीत मैफिल तसेच हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलात अश्‍व शर्यतींचा थरार पहावयास मिळणार आहे.


Exit mobile version