कार्यालयाच्या इमारतीवर झाड कोसळले

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत शहरातील दहीवली येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे कार्यालय असलेल्या इमारतीवर झाड कोसळले. त्यामुळे तेथील उपअभियंता कार्यालयात पाण्याची गळती सुरू झाली असून पाणी गळती रोखण्यासाठी नवीन पत्रे छपरावर टाकावी लागणार आहेत.

दहीवली गावात श्रीराम पुलाजवळ जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग कार्यालय आहे. 25 वर्षापासून तेथे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालय असून त्या इमारतीच्या बाजूला अनेक जुनी झाडे आहेत. त्यातील एक झाड दि.27 रोजी कार्यालयाच्या इमारतीवर कोसळले. त्याचा परिणाम कार्यालयात पावसाच्या पाण्याची गळती सुरू झाली असून या पाण्यामुळे उप अभियंता यांच्या केबिलला डबक्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे कार्यालयातील किमती वस्तूंचे नुकसान होत असून केबिन मध्ये सुरू असलेले पाणी साठवण्यासाठी प्लास्टिक बादल्या खरेदी करण्यात आल्या आहेत.

नुकसानीची पाहणी कर्जत पंचायत समितीचे प्रशासक आणि गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी केली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या गळती बद्दल सूचित केले असून तत्काळ उपाययोजना कराव्या लागणार असल्याने मान्यता देण्यात यावी, अशी सूचना केली आहे.

Exit mobile version