रेस्टॉरंटवर कोसळले झाड

| माथेरान | वार्ताहर |

जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानमध्ये एका रेस्टॉरंटवर महाकाय झाड कोसळले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. झाड इतक्या जोरात कोसळले की, क्षणार्धात होत्याच नव्हतं झाले. हॉटेल खूप वर्षापूर्वीचे असून माथेरानमधील परिचित रेस्टॉरंटमध्ये याची गणना होते. सायंकाळी नगरपालिकेचे कर्मचारी येऊन झाडाच्या फांद्या काढून रस्ता मोकळा केला. मात्र कोणताही पंचनामा झाला नसल्यामुळे ते झाड तसेच होते. तदनंतर वन विभाग व महसूल विभागाकडून रीतसर पंचनामा करण्यात आला. दुसर्‍या दिवशी सकाळी हे झाड काढण्यात आले.

Exit mobile version