एक झाड माझ्या सत्यवानासाठी

पनवेल शेतकरी कामगार पक्षाचा स्तुत्य उपक्रम

। पनवेल । वार्ताहर ।

वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी वडाच्या वृक्षाची तोड करून वृक्षहानी ही मोठ्या प्रमाणात होते. या गोष्टी लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उलवे मधील भगिनींसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने वडाचे छोटे रोपटे पूजनासाठी सोसायटी आणि सोसायटीच्या परिसरांमध्ये भेट म्हणून देण्याचा उपक्रम वटपौर्णिमेनिमित्त राबवण्यात आला.

भगिनींना आपल्या इमारतीच्या आवारातच सोसायट्यांमध्ये सदर रोपे देऊन पूजन करण्यासाठी आमच्याकडून एक पाऊल उचलण्यात आले आहे असे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्याकडून सांगण्यात आले. या उपक्रमात आम्ही उलवेकर महिला मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेऊन सदर रोपटे विविध ठिकाणी महिलांना भेट दिले.

Exit mobile version