आदिवासी महिलेचे प्रांताधिकारी कार्यालयांवर उपोषण

| उरण । वार्ताहर ।

उरण येथील दिघोडे गावातील आदिवासींची जमीन बिगर आदिवासींच्या नावे झाली आहे. हा फसवणूक करून केला असल्याचा आक्षेप घेत मूळ शेतकर्‍याची नात असलेल्या जेष्ठ आदिवासी महिलेने गुरुवारी प्रजासत्ताक दिनी पनवेल येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

उरणमधील दिघोडे येथील गोपाळ लहान्या कातकरी यांच्या नावे असलेली जमीन बिगर आदिवासी असलेल्या घरत कुटुंबाच्या नावे करण्यात आली आहे. हा फेरफार पनवेल येथील प्रांताधिकारी कार्यालयातून आले आहे. यासाठी आडनावात बदल करून कातकरीचा कासकरी केला असल्याचा आक्षेप मूळ मालकाची नात मुक्ता अनंत कातकरी यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे 20 जानेवारीला या संदर्भात करण्यात आलेले अपील फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे या जमिनीचे हस्तांतरण व विक्रीची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावे, यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाला अनेक संघटना उपोषण स्थळी येवून सदर उपोषणास पाठिंबा देत आहेत.

Exit mobile version