सिमेंट भरलेल्या ट्रकची संरक्षण भिंतीला धडक

| आगरदांडा | प्रतिनिधी |

सोलापूर येथून सिमेंटने भरलेला ट्रक क्रमांक के.ए.28 ए.ए.3596 हा मुरुडकडे जात असताना गारंबी वळणावर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रकने संरक्षण भिंतीला धडक दिली. मुरूड राजपुरी या ठिकाणी जेट्टीच्या बांधकाम करिता सिमेंटचे भरलेले ट्रक सोलापूर याठिकाणी वरून मागविण्यात आला होता. तोच ट्रक याठिकाणी येत असताना गारंबीच्या वळणावर गाडीचा टन बसत नसल्याने शेवटी चालकांनी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला. परंतु; गाडीचे पाठीमागचे टायर जाग्यावर फिरत असल्याने गाडी पलटी होण्याचा संभव असल्याने पुन्हा गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना गाडीचा ब्रेक पटकन न लागल्याने टन वरील संरक्षण भिंतीला धडक दिली. चालकांनी हुशारीने गाडीचे ब्रेक व ह्यआन्ड ब्रेक दाबल्याने गाडी जाग्यावर थांबली.ताबडतोब गाडीमधील असणारे 2 जणांनी उतरविण्यात आले. आज गाडीचा ह्यआन्ड ब्रेक लागला नसता तर 100 फुट गाडी खाली पडुन मोठा अपघात झाला असता.

रोहा वरुन मुरुडला येण्यासाठी केळघर मार्ग शॉटकट असल्याने या रस्त्यावरून पर्यटकासह शेकडो गाड्या ये-जा करित असतात याचं रस्त्यावर मोठा ट्रक वळणावर अडकल्याने या ठिकाणी ट्रॉफीकला अडथळा येऊ लागला. स्थानिकांची व ट्रकच्या मालकांच्या साह्याने याठिकाणी मोठा क्रॉन मागविण्यात आला. क्रॉनच्या साह्याने सिमेंट ट्रकला बाजूला करण्यात आला. आणि ट्रॅफिक सुरळीत करण्यात आली. मुरुड व पंचक्रोशीभागातील बांधकाम ठेकेदारानी आपल्या बांधकाम करिता सिमेंट, लोखंड, लादी व इतर बांधकाम वस्तू बाहेरच्या जिल्ह्यांतुन मागविताना गारंबी- केळघर रस्त्यावरून न येण्याच्या सुचना तेथील चालकाला व मालकांना द्याव्यात जेणेकरून याठिकाणीच्या रस्त्यावर रहदारी व होणारा अपघात टाळता येईल. असे आवाहन मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक-प्रकाश सकपाळ यांनी केले.

Exit mobile version