दोन एकरात फुलविला झेंडूच्या फुलांचा मळा

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात भाजीपाल्याच्या पिकासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कृषीनिष्ठ बाहे गावातील फुलवाले तथा कृषीनिष्ठ शेतकरी ह.भ.प.काशिनाथ थिटे यांनी आपल्या शेत जमिनीतील दोन एकरात झेंडूच्या फुलांचा मळा फुलविला आहे.

ह.भ.प.काशिनाथ थिटे यांचे सुपुत्र संतोष थिटे आणि सर्व परिवाराचे या कामी त्यांना मोठे सहकार्य लाभत असून या मळ्यातून दररोज कमित कमी 50 ते 60 किलो झेंडूच्या फुलांचे उत्पादन मिळत आहे.सध्या सर्वत्र संपन्न होत असलेल्या कार्यक्रमांमुळे फुलांना चांगली मागणी मिळत तसेच स्वतःच्या फुलांच्या व्यवसायात देखील फुले चांगल्या पद्धतीने उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. भाजीपाला पिकाच्या पुरक व्यवसाय म्हणून काशिनाथ थिटे यांनी केलेल्या नाविण्यपूर्ण प्रयोगामुळे इतर शेतकरी वर्गातून चांगले कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version