| चिरनेर | वार्ताहर |
नृत्यप्रकारात आवरे गावाचे नाव सातासमुद्रापार नेणारे नृत्यदिग्दर्शक सचिन पाटील यांच्या संकल्पनेवर आधारित ‘सन्मान लोककलेचा’ ही नृत्याविष्कार रजनी आवरे गावात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
सदर स्पर्धेचे उद्घाटन हे आवरे गावच्या प्रथम नागरिक निराबाई पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राजा अत्रे, रत्नाकर म्हात्रे, अशोक ठाकूर, नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील, गावंड, अविनाश गावंड, संतोष पाटील, सुयश क्लासेस आवरेचे अध्यक्ष निवास गावंड आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन हे मयूर गावंड यांनी, तर कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते चेतन म्हात्रे यांनी केले. कार्यक्रमासाठी लागणारे सर्व सन्मानचिन्ह हे आवरे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील व शिवसेना युवा नेतृत्व अमित म्हात्रे यांनी दिले. साऊंडची व्यवस्था ठाकूर यांनी केली.