अनोखी गुरुपौर्णिमा साजरी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. मात्र, अलिबाग तालुक्यातील मुळे येथील रायगड भूषण निलेश जंगम यांनी अनोखी गुरूपौर्णिमा साजरी केली. दत्तात्रेय बुवा ओढांगीकर व वैकुंठवासी परशुराम बुवा पांचाळ यांचे शिष्य असलेले जंगम यांनी अभंगातून गुरुवंदना दिली.

यावेळी अभंग व गौळण गाण्यात आले. अनेक शिष्य व लहान थोर यांनी एकत्रित एकत्र येऊन मुळे येथील त्यांच्या राहत्या घरी गुरुपौर्णिमा साजरी केली. सुरुवातीला सरस्वती पुजन केले. त्यानंतर अंभग गाण्यास सुरुवात केली. यामध्ये किर्तीकांत पाटील, रविंद्र जंगम, मानसी पाटील आदी 40 हून अधिक शिष्यांनी सहभाग घेतला. एक वेगळा उत्साह या निमित्ताने निर्माण झाला होता.

Exit mobile version