। माणगाव । प्रतिनिधी ।
इफ्तार पार्टीमुळे हिंदू-मुस्लिम समाजातील स्नेहभाव अधिक प्रमाणात वृद्धिंगत होऊन सामाजिक एकोप्याचे दर्शन घडते, असे प्रतिपादन माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. राजीव साबळे यांनी माणगाव येथील इफ्तार पार्टी कार्यक्रमात बोलताना सांगितले. लोकनेते माजी आमदार अशोक साबळे विधी महाविद्यालय, द.ग.तटकरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.3) सायंकाळी महाविद्यालयाच्या प्रांगणात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टी कार्यक्रमाला महाड, पोलादपूरच्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवाना पवित्र रमजान महिन्याच्या व येणार्या रमजान ईदच्या खास शुभेच्छा दिल्या.
सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु असून या महिन्यात मुस्लिम बांधव पहाटे लवकर उठून रोजा(उपवास) धरतात. सायंकाळी मगरीब नमाजच्या बांगीबरोबर हा रोजा सोडला जातो त्यास इफ्तारी असे म्हणतात. या पवित्र रमजान महिन्यात माणगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवाना इफ्तार पार्टीच्या निमित्ताने एकत्र आणण्याचे काम अँड.राजीव अशोक साबळे व सहकार्यांनी केले.