इफ्तार पार्टीमुळे एकोप्याचे दर्शन : अ‍ॅड. साबळे

| माणगाव | प्रतिनिधी |
इफ्तार पार्टीमुळे हिंदू-मुस्लिम समाजातील स्नेहभाव अधिक प्रमाणात वृद्धिंगत होऊन सामाजिक एकोप्याचे दर्शन घडते असे प्रतिपादन माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजीव साबळे यांनी माणगाव येथील इफ्तार पार्टी कार्यक्रमात प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. पवित्र रमजान महिन्यात माणगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवाना इफ्तार पार्टीच्या निमित्ताने एकत्र आणण्याचे काम अ‍ॅड. राजीव अशोक साबळे व सहकार्‍यांनी केले.

त्यासाठी लोकनेते माजी आमदार अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठान,द.ग.तटकरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी द.ग. तटकरे महाविद्यालयाच्या प्रांगणात इफ्तार पार्टीचे आयोजन दिमाखदार पद्धतीने अ‍ॅड. राजीव साबळे व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी केले होते. यावेळी माणगाव नगरपंचायत हद्दीतील तसेच तालुक्यातील मोर्बा, टेमपाले, दहिवली, लोणशी, साई, निजामपूर आदी गावांतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी अ‍ॅड. राजीव साबळे व सहकार्‍यांनी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत केले.

Exit mobile version