बोरगावमध्ये घराची भिंत कोसळली

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओलमन ग्रामपंचायत मधील बोरगांव या गावात एका आदिवासी कुटुंबाच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. भिंत कोसळल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घराच्या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने पूर्ण केला आहे.

कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील बोरगांव गावातील संगीता चौरे यांच्या घराची भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या जोरदार पाऊस सुरू असून शुक्रवार पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. तालुक्यातील बोरगांव गावातील संगीता हरिश्‍चंद्र चौरे यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. शनिवारी घराची भिंत कोसळली असून घरातील वस्तूंची नासधुस झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र सुमारे 50 हजाराचे नुकसान झाल्याचे चौरे यांनी सांगितले आहे. दरम्यान स्थानिक सरपंच व तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे करून अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठवले आहेत.प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी चौरे यांनी केली आहे.

Exit mobile version