गडबमध्ये भरला विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार

संस्कार विद्यालयाचा उपक्रम

। गडब । वार्ताहर ।

पेण तालुक्यातील संस्कार शिक्षण संस्था संचालित संस्कार विद्यालय गडब या शाळेने विद्यार्थाचे आठवडा बाजाराचे आयोजन गडब येथील कांळबादेवीच्या सभा मंडपात करण्यात आले होते.

विद्यार्थाना व्यवहारज्ञान, नफा, तोटा, व गणितिय ज्ञान यांची संकल्पना दृढ होण्यासाठी विद्यार्थानी आणलेल्या वस्तुच्या विक्रीचे आठवडा बाजार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गडब येथील कांळबादेवीच्या मंदीरांचे सभा मंडपात विद्यार्थानी वस्तुची दुकाने मांडुन वस्तुची विक्री केली. या मध्ये भाज्या, फळे, स्टेशनरी, खेळंणी, किराणा माळ,खाद्यपदार्थ आदि प्रकारच्या दुकाने उभारण्यात आली होती.

या बाजाराला संस्कार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय चवरकर, काराव-गडब ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील, मुख्याध्यापक चिंतामण मोकल सचिव संदीप म्हात्रे सहसचिव, नवनिर्वाचित ग्रुप ग्रामपंचायत कारावचे सदस्य दिनेश म्हात्रे, खजिनदार विश्‍वनाथ पाटील देविदास कोठेकर, सदस्य मनोज म्हात्रे, दीपक कोठेकर, रविंद्र म्हात्रे, कीर्ती म्हात्रे, मुक्ता वाघमारे, मंगेश पाटील, अंकुश वाघमारे, प्रभावती मोकल, विजया पाटील, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, समस्त पालक वर्ग व विद्यार्थी मित्र आणि हितचिंतक आदिसह विद्यार्थ्यांचे पालक, परिसरातील नागरिकांनी भेट देवुन विद्यार्थ्यांकडून वस्तुची खरेदी करुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

विद्यार्थ्याना व्यवहारीक ज्ञान व्हावे, व बाजारातील वस्तुची किमंत कळावी, व्यवसाययाची माहिती मिळावी, खरेदी विक्रीचे व्यवहार समजावेत, फायदा तोटा यांची प्रत्यक्ष माहिती मिळांवी व्यवहारीक संवाद कसे करावेत यासाठी आठवडा बाजार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

संजय चवरकर
संस्कार संस्था अध्यक्ष

होलसेल बाजारातून खरेदी करुन आणलेल्या वस्तुची विक्री या आठवडा बाजारात करुन त्या मधुन नफा झाला तर नेहमी आम्ही दुकानावर वस्तु खरेदी करण्यासाठी जात आसतो. मात्र शाळेने भरविलेल्या या आठवडा बाजारात दुकानदार झालो. दुकान कसे चालवावे याची माहीती मिळाली आसल्याचे विद्यार्थानी या वेळी सांगितले.

Exit mobile version