राजपुरी गटात प्रचाराचा झंझावात

| कोर्लई | प्रतिनिधी |

शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव ठाकरे) व मित्र पक्षाचे राजपुरी जिल्हा परिषद गटातील उमेदवार अजित कासार व पंचायत समिती गणातील उमेदवार अस्लम हलडे यांच्या प्रचाराचा झंझावात मतदार संघात असून ठिकठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच नांदगाव तसेच मजगांव येथील कुंभारवाडा, भंडारआळी, नवीआळी-कोळीवाडा व खार मजगांव या ठिकाणी घरोघरी जाऊन काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज भगत, मुरुड नगराध्यक्षा आराधना दांडेकर, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, आशिका ठाकूर, हसमुख जैन, अंकुश चाचे, प्रिता चौलकर, कॉग्रेसचे नेते ॲड. इस्माईल घोले, जि.प. माजी सदस्य नम्रता कासार, सरपंच सेजल घुमकर, सुदेश घुमकर, सचिन पाटील, नरेश कुबल, हमिद कडू, मुस्तकिन साठे, महंमद चिपळूणकर यांच्यासह शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव ठाकरे) व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते.

Exit mobile version