दुरटोली गावानजीक लागला वणवा

| सुतारवाडी | प्रतिनिधी |

दुरटोली गावा नजीक असलेल्या दुरटोली आदिवासी वाडी या परिसरामध्ये बुधवारी (दि.7) सायंकाळी चारच्या सुमारास सपाट मैदानाला प्रचंड प्रमाणावर वणवा लागला. या सपाट मैदानामध्ये गुरांच्या वैरणीसाठी असलेला सुमारे सहा एकर जमिनीवरील गवत जळून खाक झाला. या गवताबरोबर लहान रोपटी तसेच जाळ्या जळून खाक झाल्या. सायंकाळी चारच्या दरम्यान वाऱ्याचा वेग प्रचंड होता, त्यामुळे परिसरातील गवताळा त्याची झळ जाऊन प्रचंड प्रमाणावर गवत जळून खाक झाले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गुर चरण्यासाठी मैदानात असतात मात्र यावेळी गुरे मैदानात नसल्यामुळे जीवित हानी टळली. मात्र, गुरांच्या वैरणीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. वनवा लागलेला समजताच दुरटोली ग्रामस्थ तसेच दुरटोली येथील आदिवासी वाडीतील बांधव यांनी मेहनत घेऊन वनवा आटोक्यात आणला.

Exit mobile version