। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विजेच्या धक्क्याने वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील वायरमन अनिल शेळके (वय 59) यांचा पोलवरुन पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.25) घडली. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रस्त्यावरील लाईट सुरळीत सुरू रहावी, म्हणून शेळके दुपारी पोलवर चढले होते. काम करताना त्यांना अचानक विजेचा धक्का बसला आणि ते पोलवरून खाली कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अनिल यांच्या मृत्यूने वेश्वीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.







