अटल सेतूवर महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न

वाहतूक पोलीसांनी वाचवले महिलेचे प्राण

। नवी मुंबई | प्रतिनिधी ।

एका 56 वर्षीय महिलेने अटल सेतूवरुन उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. मात्र, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधान आणि समयसुचकतेमुळे महिलेला वाचविण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलूंड येथे राहणाऱ्या रीमा पटेल (56) या महिलेने अटल सेतूवरुन उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गस्तीवर असलेले पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी मोठ्या शिताफीने महिलेला वर खेचले. ही घटना शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पोलिसांच्या चौकशीनुसार, ती महिला आत्महत्या करायला आली नसून देवांचे फोटो विसर्जन करण्यासाठी अटल सेतूवर आली होती. अटल सेतूवर पोहोचल्यानंतर ती एक एक फोटो समुद्रात टाकत होती. यावेळी कॅब चालकाला संशय आल्याने त्याने तिला पकडून ठेवले.

Exit mobile version