विद्यानगर येथील महिलेची फॉरेट घेऊन आत्महत्या

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग शहरातील विद्यानगर येथील मंगला सखाराम घरत या पन्नास वर्षीय महिलेने तिच्या राहत्या घरी आज (दि. 16) दुपारच्या सुमारास फॉरेट नावाचे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. सदर महिलेस उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता तिला वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version