| पनवेल । वार्ताहर ।
कामोठे वसाहतीतील सेक्टर 17 येथे राहत असलेली 65 वर्षीय महिलेचे दागिने दोघा भामट्यांनी हातचलाखीने लंपास केले. ही महिला सिंधुदुर्ग येथून मुलाला भेण्यासाठी कामोठे येथे आली होती.. सकाळच्या सुमारास भाजीपाला घेण्याकरिता घराबाहेर पडली होती.यावेळी सेक्टर 11 येथील भाजी मार्केट येथून घरी जात असताना तिच्या पाठीमागून दोन अज्ञात इसम आले व त्या महिलेला आमचे साहेब फूकट रेशनिंग देतात, तुम्हालाही रेशन मिळेल, असे सांगितले.त्यासाठी अंगावरील सोन्याचे दागिने काडून ठेवावे लागतील असे सांगत त्या दोन भामट्यानी त्या महिलेच्या अंगावर असलेले 46 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच महिलेने थेट कामोठे पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली, त्यानुसार कामोठे पोलीस अधिक तपास करीत आहेत.