मांडवा येथे रंगणार कुस्ती स्पर्धा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी (दि.11) टाकादेवी स्पोर्ट्स क्लब व मांडवा ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2.30 वाजता स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी राज्य, जिल्हा व तालुक्यातील नामवंत आखाड्यातील पेहेलवान व कुस्तीप्रेमी उपस्थित राहणार आहेत. तरी, या स्पर्धेकरिता कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आह

Exit mobile version