| बीड | वृत्तसंस्था |
एकवीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने किटकनाशक औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराईच्या जातेगावात घडली आहे. कृष्णा रामदास पांढरे (21), रा. जातेगाव, ता. गेवराई असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतक-याचे नाव आहे. गुरुवारी (दि.15) दिवसभर कृष्णाने शेतातील कापसाची फवारणी केली. सायंकाळी त्याने गावाच्या काही अंतरावर असणाऱ्या गूळ कारखान्याजवळ कपाशीवरील फवारणीचे किटकनाशक औषध पिल्यानंतर गावातील सहकाऱ्याला फोन करून मी औषध प्यायलो आहे, असं फोनवर त्याने सांगितले. सहकाऱ्याने घटनास्थळावर धाव घेऊन कृष्णाला तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.