। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
छतावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे-एमआयडीसी येथे घडली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अभिजित आत्माराम शेलार असे मृताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित हा बुधवारी सकाळी मिरजोळे-एमआयडीसी येथील एका कंपनीत कामाला गेला होता. कंपनीच्या छतावर काम करत असताना अचानक पत्रा तुटल्याने तो खाली पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.