। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवानिमित्त गावी येत असलेल्या तरूणाचा संगमेश्वर तालुक्यातील आरवलीदरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घटली आहे. ही घटना शनिवारी (दि.14) दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. आत्माराम शरद सावंत (30) असे या तरूणाचे नाव आहे.
आत्माराम सावंत हा गेली सात वर्षे मुंबईतील जोगेश्वरी येथे राहत होता. गणेशोत्सवासाठी तो शनिवारी पहाटे मेंगलोर एक्सप्रेसने प्रवास करीत होता. मात्र, आरवली प्रवासादरम्यान रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने आत्मारामला रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले.