आंंघोळीकरिता गेलाला तरुण बेपत्ता

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील जेटीएल कंपनीच्या मागील बाजूस नदीकिनारी अंघोळीकरिता गेलेला 19 वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाला. सदरची घटना शनिवारी (दि.8) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद विजयकुमार राम खेळावल सरोज यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

अमर बबलू सरोज (19) रा. मीरपूर राज्य उत्तरप्रदेश हा माणगाव तालुक्यातील जेटीएल कंपनीच्या मागील बाजूस नदीकिनारी अंघोळीकरिता गेला असता आजपर्यंत परत आलेला नाही. त्याचे वर्णन उंची अंदाजे 5 फूट 3 इंच, रंग गोरा, अंगात निळ्या रंगाचा शर्ट, टॉवेल घातलेला असे आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. तुणतुणे हे करीत आहेत.

Exit mobile version