| उरण | वार्ताहर |
पिरकोण – सारडे रस्त्यावर तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (दि.19) आढळून आला आहे. या संदर्भात उरण पोलीसांनी तपास केला असता पनवेल तालुक्यातील कळवणे गावातील रहिवासी राजेश हरिदास ठाकूर हा तरुण असल्याचा तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजेश हरिदास ठाकूर (40) हा तरुण आपली पत्नी व तीन लहान मूली सोबत केळवणे या आपल्या गावात राहत असून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जेएनपीए बंदर परिसरात कँटिनचा व्यवसाय करत होता. शुक्रवारी (दि.19) राजेश हा आपल्या घराकडे रात्री 8.45 च्या सुमारास आपल्या मोटारसायकल वरून निघाला होता. 9च्या सुमारास राजेशला त्यांच्या पत्नीने मोबाइल व्दारे फोन केला होता. त्यावेळी राजेश कोप्रोली नाक्यावर सामान घेत असल्याचे त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले. परंतु बराच वेळ होऊनही आपला पती राजेश घरी का आला नाही. पत्नीन व नातेवाईकांनी शोध घेतला असता राजेशची मोटारसायकल सारडे रस्त्यावर पडलेली दिसुन आली तसेच रस्त्याच्या कडेला राजेश पडलेल्या दिसून आला.
या घटनेची माहिती नातेवाईक मंडळीने उरण पोलीसांना दिली असता उरण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर जागेचा पंचनामा करून राजेशला इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. राजेशचा जागीच मृत्यु झाला होता. मात्र, राजेश ठाकूर यांचा मुत्यू कशामुळे झाला यासंदर्भात जनमानसात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मृत्यू कशामुळे झाला याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत.