। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे हे विद्येचे माहेर घर आहे. या शहरात अनेक मैल पार करून विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी येतात. मात्र, याच पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणीचा घरमालकाने विनयभंग केला असल्याची घटना घडली. हा प्रकार 12 डिसेंबरच्या रात्री पार्टीहून परतताना घडला असून, तरुणीच्या तक्रारीवरून घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय तरुणींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात जॉब करते. 12 डिसेंबरच्या रात्री तरुणी तिच्या मित्र मैत्रिणींसोबत पार्टीसाठी गेली होती. पार्टीत या तरुणीने मद्य प्राशन केले होते. दारु जास्त झाल्याने तिला चालता येत नव्हते. तरुणी नशेत असल्याने तिला तिच्या मित्र मैत्रिणींनी हॉस्टेलच्या पायऱ्यांवर सोडले. त्यानंतर तरुणीच्या घरमालकाने तिला बसलेली बघून मागून येऊन मिठी मारली आणि अंगाला नको तो स्पर्श करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणीने पोलीस ठाणे गाठत घरमालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक साळवे तपास करीत आहेत. दरम्यान पुण्यासारख्या उच्चशिक्षित शहरात मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यात पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणीचा विनयभंग
