| रसायनी | प्रतिनिधी |
बावीस वर्षीय तरूणी बोटाला दुखापत झाल्याने औषधोपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्या हॉस्पिटलमधून येत असताना एका दुकानाजवळ एका अनोळखी स्कूटी चालकाने स्कूटी थांबवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. यानंतर आरोपी अनोळखी स्कूटी चालक त्याची ताब्यातील स्कुटी घेऊन निघून पळून गेला. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 74 प्रमाणे नोंद करण्यात आली असून, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पवार अधिक तपास करीत आहेत.







