| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गुंगीचे औषध तथा ड्रग्ज प्रकरणी आक्षीमधील एका तरुणाला अलिबाग पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईने ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांना दणका मिळाला आहे. सुरज राणे असे या तरुणाचे नाव आहे. जीममध्ये जाणाऱ्या तरुणांना नशा येणारे इंजेक्शन विक्री करीत होता. ही बाब अलिबाग पोलिसांना समजताच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो वेल्डींगचे काम करणारा आहे. वेल्डींगच्या दुकानात नशा येणारे इंजेक्शन विकण्याचा हा धंदा चालवित होता.







