| रसायनी | वार्ताहर |
रसायनी सावळे मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून, दोन आठवड्यापूर्वी गुळसुंदे येथील तरूणाचा याच रस्त्यावर दुचाकी वेगाने चालवून अपघात झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच वावेघर येथील प्रतिक चव्हाण याचा जागीच मृत्यू झाल्याची भयानक घटना घडली आहे. प्रतिकने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने मोटारसायकल चालवून तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. रसायनी पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन प्रतिक यास ग्रामीण रूग्णालय चौक येथे दाखल केले. परंतु, गंभीर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा चौरे अधिक तपास करीत आहेत.