चोर असल्याच्या संशयावरून युवकाला मारहाण

| अहमदनगर | वृत्तसंस्था |

शहरातील सारसनगर भागामध्ये चोर असल्याच्या संशयावरून एका परप्रांतीय युवकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे अहमदनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सारसनगर येथील औसरकर मळ्यात एका परप्रांतीय व्यक्तीला चोर असल्याच्या संशयावरून झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि.25) रोजी घडली आहे. राजू हिरा घोष असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण औसरकर, बाबासाहेब पुंड, विशाल इवळे, ऋषिकेश जायभाय, ऋतिक पुंड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घोष हा चोर असल्याच्या संशयावरून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. सध्या घोष याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version