कोरोनामुळे पालक गमावलेल्या पाल्यांना आदर्श बँकेचा आधार

अनाथ मुलीला पदवीपर्यंत शिकविणार
 I अलिबाग I प्रतिनिधी I
कोरोनामुळे आई – वडील गमावलेल्या अनाथ मुलीच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय अलिबाग येथील  आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने घेतला. त्याची अंमलबजावणी ताबडतोब करण्यात आली. प्राथमिक खर्चासाठी रुपये अकरा हजार रुपयांचा  धनादेश  देण्यात आला.

अलिबाग तालुक्यातील मुळे गावातील परशुराम थळे व त्यांच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या 10 वीत  शिकणार्‍या अनाथ मुलीचा पुढील शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय आदर्श नागरी  सहकारी पतसंस्थेने घेतला. आदर्श परिवाराकडून मदत म्हणून सामाजिक निधीतून पदवीपर्यतचे शिक्षणासाठी पुढील पाच वर्षे होणारा सर्व खर्च करण्यात येणार असून, त्याना प्राथमिक खर्चासाठी अकरा हजाराचा चेकही देण्यात आला. अश्या प्रकारे  आदर्श पतसंस्थेने कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपली आहे.

कोरोनामुळे आदर्श  पतसंस्था अलिबागचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या 69 व्या वाढदिवस देखील साधेपणाने साजरा करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाचे  औचित्य साधून आदर्श  परिवाराने सलग आठव्या वर्षीही रक्तदान शिबीर आयोजित केले होते त्याला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षीही करोना परिस्थिती मुळे वाढदिवसाच्या दिवशी कोणीही भेटायला येऊ नये असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे असंख्य चाहत्यांनी फोनवरून व मेसेजेस पाठवून  अभिष्टचिंतन केले. मुख्य   कार्यालयात काही मोजकेच संचालक व वरिष्ठ अधिकारी याना संबोधताना चेअरमन सुरेश पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील कोरोनामुळे मयत झालेल्या सभासद व कर्जदारांचे बाबतीत दुःख व्यक्त केले. यावेळी पतसंस्थेच उपाध्यक्ष सतिश प्रधान,सचिव कैलास जगे,संचालक  काका जैन,अनंत म्हात्रे,जगदीश पाटील,सुरेश गावंड,वर्षा शेठ,विजय पाटील उपस्थित होते.

Exit mobile version