। पाली/बेणसे । वार्ताहर ।
कांढरोली येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गंगाराम अडसुळे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ खालापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व खालापूर केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झाला. सुरेश अडसुळे यांना बेणसे सिद्धार्थ नगर येथील ग्रामस्थांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक सुरेश अडसुळे यांनी शिक्षण क्षेत्रातील 38 वर्ष सचोटीच्या सेवेनंतर ह्या सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांनी आजवर अनेक आदर्श विद्यार्थी नागरिक घडविण्याचे काम केले. त्या निमित्ताने शिक्षक परिवाराच्यावतीने त्यांचा सेवापूर्ती सत्कारसमारंभ आयोजन करण्यात आला. यावेळी वरिष्ठ विस्तार अधिकारी शिल्पा दास, केंद्रप्रमुख नंदा मोहिते, तालुका प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष संदीप जाधव, सरचिटणीस दिपक पालकर, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कडू, संतोष पाटील, उमेश विचारे, विठ्ठल देशमुख, मारुती दासरे, अंजली विचारे, धनाजी थिटे, अनिता चव्हाण, दिपाली कांबळे, वंदना कदम, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.