आकाश भडसावळेचा नाट्य क्षेत्रात विक्रम

| नेरळ । वार्ताहर ।
नेरळकर असलेला नाट्य कलावंत आकाश भडसावळे या कलाकाराने रंगभूमीवर सलग 12 प्रयोग करीत नाट्य सृष्टीत नवा विक्रमला गवसणी घातली आहे. आकाश भडसावळे यांनी तीन नाटकांचे प्रत्येकी चार प्रयोग रंगभूमीवर सलग साकारले आणि नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. टेलिपथी,मरणोत्पात आणि अस्थिकलश या तीन नाटकांचे प्रयोग नऊ ऑक्टोबर रोजी ठाणे आणि मुलुंड येथील नाट्यगृहात सादर केले.

यावेळी एकूण तीन नाटकांचे प्रत्येकी चार असे 12 प्रयोग सादर झाले. त्यात योगेश सोमण लिखित सस्पेन्स टेलिपथी, होता. सुयश पुरोहित लिखित व दिग्दर्शित ब्लॅक कॉमेडी मरणोत्पात आणि इरफान मुजावर लिखित अस्थिकलश या नाटकाचे प्रयोग सादर केले गेले. यावेळी हास्यजत्राच्या काही कलाकारांची आणि आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांची उपस्थिती होती.

Exit mobile version