| महाड | प्रतिनिधी |
शिक्षण विभाग पंचायत समिती महाड, रायगड कॉलेज ऑफ फार्मसी मोहोप्रे आणि महाड तालुका विज्ञान गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पद्माविभूषण सत्येंद्रनाथ बोस विज्ञान नगरी रायगड कॉलेज ऑफ फार्मसी, मोहोप्रे येथे दि. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडले. सुभाष चंद्रकांत निकम शैक्षणिक संस्थेची ट्विंकल स्ट्रार इंग्रजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने यात सहभाग घेतला होता. यात माध्यमिक गटातून इ. 6 वी ते 8 वीमध्ये आरोही संतोष कदम या विद्यार्थीनीने प्रतिकृती सहभाग घेतला होता. त्यात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत तिने तालुका स्तरीय प्रथम क्रमांक पटकवला. तर इ. 9 ते 12 वी या उच्च माध्यमिक गटामध्ये अंजली अभय सिंगने ही प्रतिकृती स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक पटकला. याबद्दल संस्थेकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.
आरोही, अंजली यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश
