आस्था थिटे पुरस्काराने सन्मानित

| कोलाड | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथे इ.8 वीमध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी आस्था विनोद थिटे हिचा राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई या राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या वतीने आस्था थिटे हिचा आळंदी येथे संपन्न करण्यात आलेल्या एका शानदार कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शिवाजी खैरे, कार्याध्यक्ष प्रदीप बोराटे, कोषाध्यक्ष अनुसया खैरे, उपाध्यक्ष निलेश कसबेकर, सचिव सविता पाटील, रोहिदास भालशंकर आदी मान्यवरांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांच्या वतीने जुलै ते नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये तिने चमकदार कामगिरी केल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक दिपक जगताप व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी तिचे अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version