आबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचविणार; डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा निर्धार

| सांगोला | जगदीश कुलकर्णी |

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्व.गणपतराव देशमुख यांचे विचार घरोघरी पोहोचविण्याचा निर्धार पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे.

शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना एखतपुर जिल्हा परिषद गटाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीवर बाबासाहेब देशमुख यांची निवड झाल्या बद्दल व आरोग्य सेवेतुन समाजकार्याचा वसा चालू ठेवल्याबद्दल डॉ. निकीता बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना स्व. आबासाहेबांच्या प्रेरणेने व बाईसाहेबाच्या आशिर्वादाने व तुमच्या सहकार्यानेच मला विविध पदांवर ती काम करण्याची संधी मिळाली आहे. हा सत्कार नाममात्र माझा असून, सारे श्रेय हे माय बाप जनतेच श्रेय आहे. हा सत्कार तुमच्या सर्वांचा आहे. असे आवर्जून नमूद केले.

येणार्‍या काळात आबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचण्यासाठी अहोरात्रपणे प्रयत्न करणार आहे. शेकापच्या माध्यमातून सर्व धर्मियांना, सर्व समुहांना आपण सोबत घेऊन काम करणार आहोत. शेतकरी सह सूत गिरणीच्या निवडणुकीत आपण सामुहीक निर्णय घेऊन निवडणुक बिनविरोध केली व चेअरमन पदांची निवडणुक सुध्दा बिनविरोध पार पाडली. हे सारे शेकापमुळेच शक्य झाले आहे. आगाीमी काळातही होणार्‍या सर्व निवडणुकांमध्येही असाच सामुहिकपणे निर्णय घेऊन उमेदवार निवडले जातील, असेही त्यानी जाहीर केले.

शेतकरी कामगार पक्षांमध्ये गटातटाच्या राजकारणाला थारा नाही.अनिकेत देशमुख व मी एकच असुन कोणी संभ्रम निर्माण करु नये आपण फक्त जनतेसाठी दिवसरात्र कार्य करायचे बाकी जनता सर्व निर्णय घेते अशी शिकवणच आबासाहेबांची आम्हा सर्वाना दिलेली आहे.

डॉ.बाबासाहेब देशमुख
प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना

यावेळी डॉ.निकिती देशमुख, कृष्णदेव भोसले, अशोकराव पवार, प्रा माणिकराव पाटील, माजी सभापती बाळासाहेब काटकर आदींनी विचार प्रकट केले. सूत गिरणीचे व्हाईस चेअरमन यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस दादाशेठ बाबर यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी, लहान व्यवसायीक यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आसलेचे सांगीतल. नवनाथ येडगे सर यांनी प्रस्तावना केली.

कार्यक्रमास बाळासाहेब येरंडे, संगम धांडोरे, बाळासाहेब पाटील, बबनराव जानकर, मायाप्पा यमगर, दिपक गोडसे, आबा बंडगर, कोंडीबा सिद, मारुती आलदर, आप्पा नवले, संजय इंगोले, जगदीश कुलकर्णी, बंडु शिंगाडे, शेखर गडहीरे, शंकर पाटील, अँड धनंजय मेटकरी, संजय शिंगाडे, अंकुश येडगे, नवनाथ शिंगाडे, विष्णू देशमुख, संतोष पाटील, केतन शेळके, ज्ञानेश्‍वर येमडे, गिरीश गंगथडे, नारायण जगताप, दततुनाना बेहरे, संजय शेजाळ, लक्ष्मण बेहरे, बिरा सरक, तानाजी हांडे, तुकाराम बंडगर, रमेश गेळे, अन्ना मेटकरी, रामचंद्र चव्हाण, दत्तात्रय डोंगरे, दादा महाजन बाजीराव सरगर, आप्पा माने, रमेश उल्हास धायगुडे, अनुसे, सोमनाथ ठोंबरे इत्यादी नेते उपस्थित होते.

सदर सत्कार समारंभाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दादसो भोसले, सायबु बंडगर, पांडुरंग गेळे, रविराज मेटकरी, विष्णू पाटील, कबीर किर्तीकर, कृष्णदेव भोसले गावडे, दयानंद बनसोडे, नवनाथ येडगेसर, संजय कोळेकर, गणेश गेळे, शिवाजी वाघमोडे, शिवाजी, किरण शेंडगे, गोवर्धन तांबे, प्रकाश देवळते, धनाजी मेटकरी, आचेंदर काळे, शशिकांत शिंदे, दगडु गायकवाड, रामा वाघमोडे इत्यादींनी परीश्रम घेतले असल्याचे माहीत प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Exit mobile version