17 वर्षीय मुलाचे अपहरण

| पनवेल | वार्ताहर |

17 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अनोळखी ईसमाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

17 वर्षीय समर याला पित्ताचा त्रास असल्याने तो आठवड्यापासून पनवेलला आयुर्वेदिक डॉक्टर यांच्याकडे ट्रेनने जात असे व ट्रेनने परत येत असे. तीन जुलै रोजी समर दुपारी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे ट्रेनने पनवेल येथे गेला. यावेळी डॉक्टरांनी समरला पनवेल स्टेशनला सायंकाळी सहा वाजता सोडले. यावेळी ट्रेन ने येतो असे त्याने आईला फोन करून सांगितले. त्यानंतर रात्री पावणेदहा वाजता डॉक्टरांना समरबाबत विचारले असता त्यांनी सहा वाजता पनवेल स्टेशनला सोडले असल्याचे सांगितले. त्यावेळी समरचा फोन बंद असे. त्यानंतर समरचा इतरत्र शोध घेतला. मात्र तो सापडून आला नाही. अनोळखी इसमाने त्याचे अपहरण केले.

Exit mobile version