। पनवेल । वार्ताहर ।
खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळील झोपडपट्टी परिसरातून एका 15 वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून कायदेशीर ताब्यातून पळवून नेल्याने सदर व्यक्तीविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. सदर मुलाचे नाव ईरवी सुरजसिंग रजगौड (15) असून त्याचा रंग- सावळा, उंची- अंदाजे 4.4 फुट, नेसणीस- पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, दोन्ही गालवार विरळ जशी जन्म खुणेची निशानी आहे. या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कामोठे पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक महेंद्र डोके यांच्याशी संपर्क साधावा.





