| अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील सायमन कॉलनीमधील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरण झालेली मुलगी ही वायशेत येथील सायमन कॉलनी येथील रहिवासी आहे. मंगळवारी रात्री तिच्या आईसमवेत होती. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास महिलेला जाग आल्यावर मुलगी जवळ दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला विचारणा केली. तरीही मुलगी सापडली नाही. ठिकठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र तिचा काही शोध लागला नाही. अखेर मुलीच्या आईने अलिबाग पोलीस ठाणे गाठले. मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. अज्ञाताविरोधात बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस नाईक एस.जे. पाटील अधिक तपास करीत आहेत.