| पनवेल | वार्ताहर |
एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने राहत्या घरातून अज्ञात कारणासाठी फूस लावून संमतीशिवाय पळवून नेल्याची घटना तालुक्यातील पेंधर गावात घडली आहे. रुबीकुमारी मुखिया असे या मुलीचे नाव आहे. रंग गोरा, उंची 4 फूट सहा इंच, केस काळे लांब, कानात बाजारु रिंग असून, अंगात लाल रंगाची सलवार व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे. तसेच तिला हिंदी व मैथिली भाषा अवगत आहे. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी तळोजा पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक सुनील घरत यांच्याशी संपर्क साधावा.






