वायशेतमधील मुलीचे अपहरण

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडली असून, याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरण केलेली मुलगी अल्पवयीन असून, ती वायशेतमध्ये तिच्या नातेवाईकांकडे राहण्यास आली होती. कोणीतरी तिला 27 जून रोजी फूस लावून तिचे अपहरण केले. ही बाब लक्षात आल्यावर नातेवाईकांनी शोध घेतला. तरीदेखील ती मुलगी सापडली नाही. त्यामुळे अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. अपहरण करणारे दोघेजण असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version