तळवलीत मायलेकीचे अपहरण

| रसायनी | वार्ताहर |

पत्नीला व मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना तळवली दांडवाडी येथे घडली असून, तळवली दांडवाडी येथील हरिश रघुनाथ जाधव (28, मोलमुजरी) यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हौसा जाधव (25) व मुलगी प्रतीक्षा जाधव (2) अपहरण झालेल्यांची नावे आहेत.

अपहरण झालेल्या व्यक्तीचे वर्णन हौसा जाधव रंगाने सावळी, उंची 142 सेमी, अंगाने बारीक, चेहरा गोळ, डोळे काळे, केस लांब, साडी व ब्लाऊज घातलेले, कपाळावर मध्यभागी जखमेचा पडलेला छोटा खड्डा, गळ्यात मण्यांची साधी गाठी, पायात साधे पैंजण, हातात हिरव्या बांगड्या, पायात चप्पल तर मुलगी प्रतीक्षा जाधव (2), उंची 2 फूट, रंगाने सावळी, चेहरा गोळ, केस बॉपकट काळे, अंगाने मजबूत असे वर्णन आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे, अंमलदार पोलीस नाईक बैकर अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version