विज्ञान प्रदर्शनात अभिनव ज्ञान मंदिराची बाजी


| माणगाव | वार्ताहर |

तळा तालुक्यांत 21 वे विज्ञान प्रदर्शन गो. म. वेदक विद्यालय तळा येथे 3 जानेवारी रोजी ऑनलाइन प्रतिकृती व वकृत्व स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा निबंध स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेमध्ये अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द तालुका तळा अव्वल ठरली आहे.

प्रशालेने एकूण पाच बक्षिसे मिळवली. यात रिया शिंदे उच्च प्राथमिक गट विज्ञान प्रतिकृती द्वितीय क्रमांक, प्रश्नमंजुषा द्वितीय क्रमांक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात रुची गुजर प्रश्नमंजुषा प्रथम क्रमांक, संतोष घाग प्रयोगशाळा परिचर शैक्षणिक निर्मिती प्रथम क्रमांक, राजेंद्र भगत माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रथम क्रमांक प्राप्त केला. या बक्षीस वितरण कार्यक्रमाला तळा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव देशमुख, गटशिक्षणाधिकारी तांबट, विस्ताराधिकारी ठाकूर उपस्थित होते. प्रतिकृतींचे परीक्षण विद्याधर जोशी यांनी केले.

Exit mobile version