अभिषेक ठकोरे यांचा छंदातून व्यवसाय

| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |

छोट्याशा गावातून मोठे स्वप्न पाहून ते पूर्ण करता येते. याचे उदाहरण म्हणजे सुधागड तालुक्यातील नांदगाव येथील अभिषेक ठकोरे. लहानपणी गाड्या बनवण्याच्या छंदातून आज अभिषेकने देशातील 22 राज्यात आपल्या हाताने बनवलेल्या वेगवेगळ्या गाड्यांची विक्री करून नाव कमावले आहे.

अभिषेकचे वडील संजीव ठकोरे हे मिनिडोर चालक आहेत, तर आई सोनल ठकोरे शिक्षिका आहेत. वडिलांसोबत लहानपणापासून मिनिडोर पाहिल्याने त्याला या वाहनाचे विशेष आकर्षण निर्माण झाले. शाळा सुटल्यानंतर आई-वडिलांना न सांगता कचऱ्यातील पुठे, बाटल्यांच्या झाकणांपासून तो स्केल मॉडेल खेळणी बनवायचा. बाजारात मिनिडोरचे स्केल मॉडेल मिळत नसल्याने त्याने स्वतःच ते बनवायला सुरुवात केली. आज त्याच्याकडे मिनिडोरचे वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य फोटो आहेत. “पुढील 1-2 वर्षात ही वाहने गावातून नाहीशी होतील म्हणून मी वडिलांची मिनिडोर जपून ठेवली आहे” असे अभिषेक सांगतो. सुरुवातीला खेळ म्हणून सुरू केलेला हा छंद आज व्यवसाय बनला आहे. हूबेहूब तयार केलेली गाड्यांची मॉडेल्स आज देशभरात विकली जात आहेत. अभिषेकच्या या यशावर आईनेही सोशल मीडियावर पोस्ट करत अभिमान व्यक्त केला आहे.

Exit mobile version