फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

| पनवेल | वार्ताहर |

राजस्थान येथील अपहरणासह खुनाच्या गुन्ह्यातील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे. राजस्थान रान्यातील जिल्हा करोलीमध्ये असलेल्या टोडाभिम पोलीस ठाण्यामध्ये 14 जुलै 2022 रोजी गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील फिर्यादी हरकेश भरतलाल मिना (36) यांनी दिलेल्या तकारीप्रमाणे एकुण आठ आरोपीत यांनी फिर्यादी व गुन्ह्यातील रतनलाल मिना (रा. मधोपुरा) यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली. त्यांच्या दुचाकी वाहनास जाणुनबुजुन धडक देऊन रतनलाल मिना यांच्या मृत्युस कारणीभुत झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील फरार आरोपी लोकेशकुमार गिरीराजप्रसाद मिना हा गुन्हा घडल्यापासुन त्याचे अस्तित्व लपवुन होता. आरोपीच्या शोधासाठी राजस्थान येथील जिल्हा विशेष पथकाचे अंमलदार एएसआय बहाद्दुर सिंग, कॉन्स्टेबल धारासिंग मिना, कॉन्स्टेबल धनसिंग मिना यांनी आरोपीच्या तांत्रिक तपासावरून त्याचे अस्तित्व पनवेल परीसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे येऊन आरोपीच्या शोधासाठी पोलीस मदत मागितल्याने पोलीस पथक तयार करण्यात आले. या पथकाने आरोपीचे प्राप्त लोकेशन नवी मुंबई नियोजित विमानतळ परीसर येथे आढळुन आल्याने त्या ठिकाणी कामगार तसेच सिक्युरीटी गार्ड सारखा वेश करून सुमारे दहा हजार कामगारांमधुन कौशल्यपूर्ण शोध घेऊन आरोपी लोकेशकुमार गिरीराजप्रसाद मिना (36 वर्ष, रा. गाव पाडली खुर्द, ता. तोडाभिम, जि.गंगापुर, राज्य – राजस्थान) यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करून आरोपीला टन्झीट रिमांड न्यायालय पनवेल यांच्याकडुन प्राप्त करून पुढील कारवाई करीता राजस्थान येथे नेण्यात आले आहे.

Exit mobile version