अबुधाबी टी-10 क्रिकेट लीगमध्ये गैरप्रकार करणे भोवले

आयसीसीकडून पुणे डेविल्सच्या तिघांवर बंदी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. 2021 मध्ये झालेल्या अबुधाबी टी-10 लीगमध्ये गैरप्रकार केल्यामुळे तीन भारतीयांवर बंदी घातली आहे. आयसीसीने 7 ऑगस्टला पुणे डेविल्स संघाचा फलंदाजी प्रशिक्षक अशर झैदी, पुणे डेविल्सचे सहसंघमालक पराग संघवी आणि कृष्णकुमार कृष्णकुमार चौधरी यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.

अशर झैदी मूळचे कराचीतील असून त्यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतलेले आहे. अशर झैदी यांनी इंग्लंडमधील लीगमध्ये क्रिकेट खेळले होते. आयसीसीने अबुधाबी टी-10 लीगमध्ये गैरप्रकार केल्याने अशर झैदींवर 5 वर्षांची बंदी घातली आहे. संघवी आणि चौधरी यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे. संघवी आणि चौधरी यांनी अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याने दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीने अमिरात क्रिकेट बोर्डाच्यावतीने सप्टेंबर 2023 मध्ये 8 जणांवर दोषारोप ठेवण्यात आला होता. त्यामध्ये अशर झैदी, संघवी आणि चौधरी यांचादेखील समावेश होता. आयसीसीने ही कारवाई 2021 मध्ये झालेल्या अबुधाबी टी-20 क्रिकेट लीग मधील गैरप्रकाराबद्दल केलेली आहे.

आयसीसीकडून वेळोवेळी क्रिकेटमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग सारखी कृती केल्यास आयसीसीकडून संबंधित खेळाडूंवर अनेकदा संपूर्ण काळासाठी बंदी घातली जाते.

झैदीवर बंदी
अशर झैदी, पराग संघवी आणि कृष्णकुमार चौधरी यांच्यावर 19 सप्टेंबर 2023 पासून बंदी लागू करण्यात आलेली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार संघवी आणि चौधरी यांच्यावर घालण्यात आलेल्या बंदीबाबत विचार करुन त्यांना 19 सप्टेंबर 2024 पासून ते क्रिकेटविषयक कामकाज सुरु करु शकतात. तर, दुसरीकडे अशर झैदी यांच्यावरील बंदीचा कार्यकाळ 19 स्प्टेंबर 2027 पर्यंत लागू असणार आहे.
Exit mobile version