दोघा तरूणांविरूद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा
| पोलादपूर | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील लोहारमाळ येथील पेट्रोलपंपावर काम करणार्या तरुणीसोबत ती अल्पवयीन असल्यापासून एडीट केलेले खोटे फोटो दाखवून दोघा तरुणांनी शारीरिक संबंध ठेवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने अधिक तपास करीत आहेत.
या गुन्ह्यामध्ये पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही ऑक्टोबर 2022 ते 21 सप्टेंबर 2024 सकाळी साडेनऊच्या सुमारास तिच्या घरामध्ये आरोपी तरूणांनी तिच्या मनाविरूध्द तिला मारहाण व दमदाटी करून एडीट केलेले खोटे फोटो दाखवून वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत शनिवारी मध्यरात्री 21 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजून 26 मिनिटांनी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये पीडित तरूणीने (सध्याचे वय 19) दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार पाहणारे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार जागडे यांनी दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलादपूर पोलीसांना मार्गदर्शन केले.