वृद्ध महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक

| मुंबई | वृत्तसंस्था ।

ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये एका 64 वर्षीय महिलेवर अत्याचार करुन तील बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर ती महिला बेशुद्ध झाली होती. त्यानंतर आरोपीने सदर महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून दिले. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश गुलाबराव ढोक (38) याने महिलेला घरी सोडतो असे सांगून तीला आपल्या घरी नेले. त्यानंतर त्याने महिलेवर अत्याचार केले. महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि आरोपी तेथून पळून गेला. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास स्थानिक महिलेला ही पीडित महिला रस्त्यावर आढळली. महिलेने संबधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. महिलेला उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पीडित महिलेने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने आपल्या आरोपाची कबुली दिली.

Exit mobile version