चुलत भावाकडून बहिणीवर अत्याचार

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील सुकापूर परिसरातील मालेवाडी एका 23 वर्षीय मुलीवर चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस अत्याचारी भावाचा शोध घेत आहेत.

मालेवाडी येथील 23 वर्षीय तरुणाने चुलत बहिणीचा विश्‍वास संपादन करुन तिला प्रेमसंबंधात गुंतवले. मागील वर्षी 30 ऑक्टोबर ते 17 जूनपर्यंत अत्याचारासाठी भाड्याने वेगळे घर घेऊन पीडितेवर अत्याचार केल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Exit mobile version