नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईत एका जिम मालकाने 24 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. जिम मालकाने पीडित तरूणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून मुंबईत बोलवले. तिला एका हॉटेलमध्ये घेवून गेला अन् तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

पीडित तरूणी उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत एका जिम मालकाने नोकरी देण्याच्या बहाण्याने 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. जिम मालकाने पीडितेला नोकरीचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. त्याने तरूणीला मुंबईत बोलावले. मुंबई, गोवा आणि लखनौ येथे वेगवेगळ्या ठिकाणी घेवून जावून तिच्यावर बलात्कार केला. बिझनेस मीटिंगच्या बहाण्याने मुंबईत बोलावलंयाप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. ही घटना मुंबईतील जुहू भागात घडली. पीडित महिला उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. जुहू पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 2019 मध्ये पहिल्यांदा आरोपीला भेटली होती. त्यावेळी आरोपीने तिला मुंबईत जिम उघडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले होते. जिममध्ये चांगल्या पगारात नोकरी देतो, असे आश्वासन आरोपीने पीडितेला दिले होते. बिझनेस मीटिंगच्या बहाण्याने मुंबईतील जुहू येथील हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने पीडितेला गोवा आणि लखनऊ येथे बोलावून तिच्यावर बलात्कार केला, असे तिने तक्रारीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी 24 वर्षीय पीडितेने जिम मालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकवेळा बलात्कार केला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अजून आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version